कोकणात ‘लोटिस्मा’ वस्तूसंग्रहालयात तोफगोळ्याची भर; युद्धभूमीवरील असल्याचा अंदाज

fire historical bomb found in konkan ratnagiri in lotismar museum
fire historical bomb found in konkan ratnagiri in lotismar museum
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेल्या वस्तुसंग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा तोफेचा गोळा मिळाला. कानडे यांनी हा तोफगोळा वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला आहे. यामुळे ‘लोटिस्मा’ वस्तूसंग्रहालयात भर पडली आहे. 

लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराने आपले हे संग्रहालय २४ नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी पाहण्यास खुले केले आहे. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ऑफबीट डेस्टिनेशन चिपळुणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव आहे.

भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्‍मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातीलपान गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मिळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजीदरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. संग्रहालयात चिपळूण परिसरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. आता इथल्या युद्धभूमीवरील तोफगोळा मिळालेला आहे. यापूर्वी रामतीर्थ तलाव परिसरात शिवकालीन नाणी मिळाली होती. 

मुकुंद कानडे यांनी संग्रहालयास तोफगोळा भेट दिल्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच असा ऐतिहासिक ठेवा आढळल्यास तो लोटिस्माकडे जतन करण्यासाठी द्यावा, असे आवाहन केले आहे.

तोफगोळा अशापैकीच एक

चिपळूण परिसरातील विंध्यवासिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ही इतिहासकाळात युद्धभूमी होती. या चौकात आदिलशाही सरदार शेख बहादूर याला तत्कालीन राजे बारराव कोळी यांनी ठार केले होते. विंध्यवासिनी ही कोळ्यांची देवता. पुढे याच परिसरात आदिलशाही सरदार शिंदे आणि राजे बारराव कोळी यांच्यात मोठी लढाई होऊन कोळ्यांचा पराभव झाला. राजे बारराव कोळी यांचे कोणतेही निशाण पाहण्यात नसले तरी शहरातील वडनाक्‍यावर असलेली एकवीरा देवी ही यांची कुलदेवता म्हणून स्थापन झालेली होती. चिपळूण परिसराला असा इतिहास असल्याने ऐतिहासिक वस्तू आढळतात. तोफगोळा अशापैकीच एक.

एक नजर

  •     कानडेंना गोळा मिळाला घराच्या जागेत
  •     १ किलो ६८५ ग्रॅम वजन
  •     वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला
  •     इतिहासकाळात चिपळूण युद्धभूमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com